
-संदीप पंडित
विरार : बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वादात सापडलेल्या वसईतील माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांना शिंदे शिवसेनेत (बाळासाहेब ठाकरे) प्रवेश देऊन पावन करून घेतल्याने पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक व जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या शिफारसीवरून एका धावत्या कार्यक्रमात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला . त्यामुळे शिंदेसेनेला माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी नंतर आणखी एक माजी नगरसेवकाचा चेहरा मिळाला आहे.