Fraud Case
ESakal
नवी मुंबई : नावातील साधर्म्याचा फायदा घेत एका माथाडी कामगाराची विमा रक्कम हडप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणात विम्याची रक्कम हडप करणारा वृद्ध व्यक्ती तसेच कोणतीही खातरजमा न करता दुसऱ्या व्यक्तीला रक्कम मंजूर करणारे बँकेचे मॅनेजर या सर्वांविरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.