त्यांनी अनेकांना वाचवलं, अन् त्यांनाच रुग्णालयात घेतलं नाही!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

सीवूड्‌स येथे शनिवारी इमारतीला लागलेल्या आगीत सात कर्मचारी जखमी झाले. या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथील "बर्न' या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले; मात्र आगाऊ शुल्क भरल्याशिवाय कोणताही रुग्ण या रुग्णालयात दाखल करून घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांना ताटकळत राहावे लागले.

नवी मुंबई : सीवूड्‌स येथे शनिवारी इमारतीला लागलेल्या आगीत सात कर्मचारी जखमी झाले. या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथील "बर्न' या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले; मात्र आगाऊ शुल्क भरल्याशिवाय कोणताही रुग्ण या रुग्णालयात दाखल करून घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांना ताटकळत राहावे लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? तळोजा येथे बसला अपघात

7 फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास सीवूड्‌स येथील "सी होम्स 'नावाच्या 22 मजली इमारतीला आग लागली. इमारतीला लागलेली आग विझविण्यास अग्निशमन कर्मचारी व अधिकाऱ्यांना सहा तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. या वेळी अग्निशमन दलाचे सात कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना साधारणतः एक वाजण्याच्या सुमारास ऐरोली येथील येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले; परंतु या रुग्णालयात आल्यानंतर आगाऊ शुल्क भरण्यास सांगण्यात येते. त्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांनासुद्धा शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ त्यांना ताटकळत उभे राहावे लागले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पैशांची हमी घेतल्याने त्या कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने दाखल करून घेतले. असा अनुभव लोकांचे प्राण वाचविणाऱ्या अग्निशमन दलाचा कर्मचाऱ्यांना आला. तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आडमुठे धोरण राबवत असल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या लक्षात येताच, त्यांनी बर्न रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णांना अशा प्रकारची वागणूक देणाऱ्या रुग्णालयावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

ही बातमी वाचली का? १६ फेब्रुवारीला कामोठ्यात चला हवा येऊ द्या

आगीमध्ये एखादा कर्मचारी मृत पावला, तर त्यांना शहीद दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अग्निशमन कर्मचारी शहीद होऊच नये यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत? 
- विजू पाटील, नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकारी संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured by fire brigade Keeping employees waiting burn hospital airoli