ओमी कलानींवर खंडणीसाठी धमकावल्याचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कल्याण : कुख्यात गुंड पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी   व त्याच्या 8 ते 10 सहकाऱ्यांविरोधात व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपावरून कल्याणमधील कोळसेवाडीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप ओमी कलानी यांनी फेटाळून लावले आहेत.

कलानी यांनी डोंबिवलीच्या एका व्यापाऱ्याला 90 लाखांच्या व्यवहारासाठी उचलून नेले. तसेच शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप संबंधित व्यापाऱ्याने केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे आरोप ओमी यांनी फेटाळले असून, राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे 'सकाळ'शी बोलताना त्याने सांगितले. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात कोण आले होते, याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

तसेच 24 तास मी सरकारी पोलिसांच्या संरक्षणात असतो. त्यामुळे असा प्रकार करणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण ओमी यांनी दिले. ओमी यांच्या आई ज्योती कलानी सध्या उल्हासनगरच्या आमदार, तर पत्नी पंचम कलानी या उल्हासनगरच्या महापौर आहेत.

Web Title: For Extortion one Threaten by Omi Kalani FIR Lodged