"'आई टीचर मला मारते" ; आईने मुलीचा हात पहिला तर होत्या...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

कल्याण - सध्या शहरी भागात नवरा बायको आणि मुलं अशी विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळते. विभक्त कुटुंब पद्धतीत घरचं काम पाहणं, आपली नोकरी सांभाळणं आणि आपल्या मुलांची काळजी घेणं अशी तारेवरची कसरत आई वडिलांना करावी लागते. अशात सर्वात सोपा पर्याय म्हणजे आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवणं. बरं पाळणाघरात लहानमुलांना किती क्रूरतेने वागवलं जात हे आपण सर्वांनी पाहिलंय. त्यासंबंधीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडलाय. हा प्रकार पाळणाघरात जरी घडलेला नसला तरीही आपण आपल्या लहानग्यांना विश्वासाने ज्या प्रिस्कुलमध्ये पाठवतो तिथं घडलाय.

मोठी बातमी - 'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा भागात वसंत व्हॅली परिसरात लर्निंग कर्व्ह नावाची प्रिस्कुल आहे. या प्रिस्कुलमध्ये माखीजा दाम्पत्य आपल्या तीन वर्षीय मुलीला दिवसभरासाठी ठेवत असत. नवरा आणि बायको दोघेही कामानिमित्त बाहेर असल्यास माखीजा आपल्या मुलीला तिथं ठेवत असत. मात्र 12 फेब्रुवारीला माखीजा यांच्या मुलीनी तिला शाळेत शिक्षिकेने मारल्याचं आईला सांगितलं. माखीजा यांच्या लहान मुलींच्या हातावर नखाच्या खुणा देखील होत्या. हे पाहताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. वृत्ती माखीजा यांनी तपासणी केली असता खुशबू नावाची शिक्षिका या मुलीला चिमटे काढताना स्पष्टपणे कैद झाल्याचं त्यांना CCTV मध्ये आढळलं. 

मोठी बातमी - महावितरणच्या इतिहासातील सर्वात दुर्मिळ चोरी, वाचाल तर...

याबाबत सौ. माखीजा यांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई केली गेली नाही. उलट शाळेचे क्लस्टर हेड निनं मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. सदर अत्यंत धक्कदायक घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाला आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे माखीजा दाम्पत्याने कल्याण पोलिसांकडे याबाबत एक महिनाभरापूर्वी तक्रार केलीये. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नसल्याचा माखीजा दाम्पत्याचाआरोप आहे. 

 त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांना डे केअर मध्ये ठेवत असाल, प्रिस्कुलमध्ये पाठवत असाल तर त्यांच्यासोबत काय घडतंय यांची नित्यनियमाने चौकशी करा

an eye opener for those who keep their kids in preschool horrible reality

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: an eye opener for those who keep their kids in preschool horrible reality