फेसबुकवर मैत्री करून ४० लाखाला फसवले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात | Money fraud crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money fraud

फेसबुकवर मैत्री करून ४० लाखाला फसवले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फेसबुकवरून मैत्री (Facebook friendship) करून एका महिला आर्थिक सल्लागाराला (woman financial advisor) ४० लाखाला फसवल्याची (money fraud complaint) तक्रार मुंबईच्या दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात (cyber police) दाखल झाली. या प्रकरणात फसवणुकीसाठी खोटी सिम कार्डस (fake sim card) वापरण्यात आली होती. ज्या व्यक्तीने ही सिम कार्डस अॅक्टिवेट केली होती, त्याला पोलिसांनी फरिदाबादहून अटक केली (culprit arrested) आहे.

हेही वाचा: आकांक्षाला भर रस्त्यात संपवण्याचं कारण आलं समोर, मुंबईतील थरारक घटना

तक्रारदार महिला ही मुंबईत आर्थिक सल्लागार म्हणून काम करते. हेन्री बर्नार्ड नावाच्या व्यक्तीने फेसबुकवरून तिच्याशी मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला एक गिफ्ट पाठवले. त्यानंतर त्याच टोळीतल्या एकाने खोटी सिमकार्डस वापरून कस्टम अधिकारी म्हणून फोन केले आणि आलेल्या गिफ्टसवर कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत ट्रान्स्फर करायला भाग पाडले.

या फसवणुकीत वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक हे खोटी कागदपत्र देऊन खरेदी करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर हे सिम कार्ड अॅक्टिवेट करणारा व्यक्ती त्या टोळीचाच सदस्य असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top