काय सांगता ? विब्स ब्रेड कंपनीत कोरोना रुग्ण आढळल्याने ब्रेडचं उत्पादन झालं बंद?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

मुंबईकर आपल्या लोकप्रिय विब्स ब्रेडच्या चवीला मुकणार का, मुंबईकरांच्या लाडक्या विब्स ब्रेडचे उत्पादन बंद झालंय का?

मुंबई, ता. 1; मुंबईकर आपल्या लोकप्रिय विब्स ब्रेडच्या चवीला मुकणार का, मुंबईकरांच्या लाडक्या विब्स ब्रेडचे उत्पादन बंद झालंय का? या प्रकारच्या अनेक अफवा सोशल माध्यमातून काही दिवसापासून उठत आहे. कारण, विब्स कंपनीच्या एका यूनीटमधला एक कामगार कोरोना संशयीत निघाला होता. मात्र कंपनीचे ब्रेड उत्पादन सुरळीत सुरु आहे. मुंबईतील केवळ एक यूनीट खबरदारीचा उपाय म्हणून बंद केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मिडीयावर विब्स ब्रेड कंपनीबद्दल वेगवेगळ्या अफवा सुरु होत्या. मात्र आम्ही फॅक्ट चेक केल्यावर विब्स ब्रेडचं उत्पादन सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत कंपनीच्या डॉकयार्ड, अंधेरी, प्रभादेवी आणि नवी मुंबई अशा चार यूनीटमधून ब्रेडचं उत्पादन होत.यापैकी केवळ डॉकयार्डमधील एक यूनीट काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विब्स ब्रेडच वितरण नेहमीप्रमाणे सुरु आहे. असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. विब्सचे ब्रेड सर्वाधिक सॅंडविचसाठी वापरले जातात.

३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...

मात्र या काळात अनेक मुंबईकरांनी सोशल माध्यमातून ब्रेड खायचे की नाही, उत्पादन बंद झाल्याचे वृत्त बरोबर आहे का? या संदर्भात मुंबई पोलिसांनाही विचारणा केली होती. मात्र डॉकयार्ड यूनीटमधील एक कामगार कोरोना संशयित होता. मात्र त्यानंतर यूनीट पुर्णपणे सॅनिटाईज करण्यात आले होते. यूनीट सिल करण्यात आले नाही. मात्र खबदारीचा उपाय म्हणून युनीट काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. अस कंपनीचे संचालक फारोख इराणी यांनी स्पष्ट केल आहे. इतर सर्व यूनीटमधून उत्पादन सुरळीत सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरेंसाठीची 'ती' गोड बातमी अखेर आली....

1973 मध्ये इराणी कुंटुबाने विब्स अर्थातचं वेस्टर्न इंडीया प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीची स्थापना झाली. आपल्या अनोख्या लज्जतीमुळे अल्पावधीतंच हा ब्रेड मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या पंसतीला उतरला. सध्या एकुण ब्रेड मार्केटमध्ये एकट्या विब्सचा वाटा 46 टक्के आहे. तर शहरातील व्हाईट ब्रेड बाजारात विब्सचा वाटा 90 टक्के एवढा आहे. सँडविचसाठी विब्स ब्रेड सर्वाधिक वापरले जातात. 2019 मध्ये या कंपनीच्या दोन मालकांमधील वाद कोर्टापर्यत गेला. त्यानंतर काही काळासाठी कंपनीचे उत्पादन ठप्प झाले होते. या काळातील बातम्यादेखील सोशल माध्यमावर नव्याने पोस्ट करण्यात आल्या आहेत.

fact check production of wibs bread stopped due to detection of covid19 positive patient


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fact check production of wibs bread stopped due to detection of covid19 positive patient