esakal | ठाकरे सरकारमधल्या मंत्र्याला फडणवीस म्हणाले 'नया है वह'...
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadanvis

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डिझॅस्टर टुरिझम  अशी टिका केली. आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी आता उत्तरं दिलंय. '

ठाकरे सरकारमधल्या मंत्र्याला फडणवीस म्हणाले 'नया है वह'...

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डिझॅस्टर टुरिझम  अशी टिका केली. आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी आता उत्तरं दिलंय. 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील नेते मात्र हेल्थ आणि डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी शनिवारी कल्याण येथे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाही प्रतिक्रियाही देऊ नये, अशा शब्दात फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

कोरोनाकाळात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील मंडळी सरकारवर टीका करत राज्यभर फिरत आहेत. ते सध्या आपत्ती पर्यटनात (डिझॅस्टर टुरिझम) व्यग्र आहेत, असा टोला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा आम्ही लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर भर देत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते. 

शरद पवार-संजय राऊत यांच्या मुलाखतीवर टीका 

संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग' असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणालेत. तसंच कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

हेही वाचा : धारावीच्या यशावर मुख्यमंत्री काय म्हणाले... 'या' शब्दात व्यक्त केल्या भावना

कोरोना चाचणी वाढवण्याची गरज

मुंबईत आजही कोरोनाच्या चाचण्या 5 ते साडेपाच हजारावर जात नाहीत. मुंबईची लोकसंख्या आणि मुंबईत होणारा प्रादुर्भाव याची जर सरासरी पहिली तर 25 ते 30% वाढत आहे. अशात जर मुंबईत चाचण्या कमी होतील तर लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल. शासनाने संख्या लपवण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या कमी केल्या आहेत. ही चुकीची पद्धत आहे, असं फडणवीस म्हणाले.

fadanvis criticizes aditya thackeray 

loading image