esakal | राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मुद्यावर," हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही," अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खाजगी वृत्त वहिनीला प्रतिक्रिया देत भाजपला इशारा दिला.
  • राऊत म्हणाले की, कोणताही मुहुर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मुद्यावर," हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही," अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खाजगी वृत्त वहिनीला प्रतिक्रिया देत भाजपला इशारा दिला. राऊत म्हणाले की, कोणताही मुहुर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असे ते म्हणाले.

ही बातमी वाचली का? आरे कॉलनीत लॉकडाऊनचा फज्जा, 33 जणांविरोधात गुन्हा

संजय राऊत म्हणले की, राज्यपालांचा परीक्षा घेण्याचा आग्रह चुकीचा असल्याचे नियतीने दाखवून दिले. राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, हे ईश्वराने दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, ईश्वर यांना मानणारे आहेत. तसेच कोणताही मुहुर्त काढा, आमचं सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असेही ते राऊत यावेळी म्हणाले.

ही बातमी वाचली का? राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 

राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुनच परीक्षा घेणे किती धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना राजभवनातील जवळपास 18 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी ट्विटवरुन मत व्यक्त करताना परीक्षा घेण्यासाठी वातावरण सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. ' राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहोचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का? की परीक्षा घेणे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का, असा सवाल सामंत यांनी केला.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)