esakal | धारावीच्या यशावर मुख्यमंत्री काय म्हणाले... 'या' शब्दात व्यक्त केल्या भावना
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीच्या यशावर मुख्यमंत्री काय म्हणाले... 'या' शब्दात व्यक्त केल्या भावना

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धारावीच्या यशावर आपल्या भावना व्यक्त केल्यात.

धारावीच्या यशावर मुख्यमंत्री काय म्हणाले... 'या' शब्दात व्यक्त केल्या भावना

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई- काही दिवसांपूर्वी कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या प्रयत्नांची दखल घेत धारावी पॅटर्नचं कौतुक केलं आहे.  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. धारावीतील घरांची रचना, मोठी लोकसंख्या, लहान जागा, चिंचोळ्या गल्ल्या यामुळे येथे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धारावीच्या यशावर आपल्या भावना व्यक्त केल्यात. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिलं आणि कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं. धारावीत सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून ॲक्टिव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे. महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचं हे यश आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रयत्नांना शाबासकी दिली.

अधिक वाचा- आरे कॉलनीत लॉकडाऊनचा फज्जा, 33 जणांविरोधात गुन्हा

धारावीला या लढ्यात एक आदर्श म्हणून मान्यता मिळाल्याने या #WarAgainstVirus मधील आमचे प्रयत्न अधिक बळकट होतील, असे महाराष्ट्र सीएमओने ट्विट केले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिका, स्वयंसेवी संस्था आणि धारावी येथील जनतेनं केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'हे तुमच्या प्रयत्नांचे यश आहे.

हेही वाचाः  कोरोना रुग्णांसाठी संजिवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वाढणार; वाचा सविस्तर


दाटीवाटीचा परिसर आणि लोकवस्ती

धारावीतील ८० टक्के लोकसंख्या ४५० सामूहिक शौचालयांचा वापर करते. बहुतेक लोकसंख्या बाहेरच्या अन्नावर अवलंबून आहे. १० बाय १० च्या घरात इथे ८ ते १० लोक राहतात. शारीरिक अंतर पाळणं, रुग्णाला होम क्वारंटाईन करणं शक्य नव्हते. अशावेळी चेस द व्हायरस उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री  आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

Maharashtra CM praised Dharavi Global Role Model Of COVID Management

loading image