मुख्यमंत्रीपद कोणाला? 'हे' तीन नेते घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

सत्तेची वाटणी समसमान होणार असं युती करताना ठरलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर सातत्याने दावा केला जातो. कधी कधी तर अडीच अडीच वर्षाची भाषाही शिवसेनेकडून होते. 

मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि सेनेच्या युतीचं जमलं आणि त्यांना यशही भरभरून मिळालं. आता विधासभेसाठीही 'युती' भक्कमपणे निवडणूक लढविणार आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण, सत्तेची वाटणी समसमान होणार असं युती करताना ठरलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर सातत्याने दावा केला जातो. कधी कधी तर अडीच अडीच वर्षाची भाषाही शिवसेनेकडून होते. 

आता हाच प्रश्न मतदारांच्या मनातही डोकावत आहे. पण विधासभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे तीन नेतेच त्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. म्हणून मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हे तीनच नेते घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fadnvis, amit Shaha and Udhhav thackrey will take decision on maharashtra cm Says Sudhir Munganthiwar