संशयित फैजलची ‘डी’ कंपनीशी लिंक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - मुंबईतून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झा (वय ३२) याची तार ‘डी’ कंपनीशी संबंधीत फारुख देवडीवाला (वय ४८) याच्याशी जुळली आहे. फैजलचा म्होरक्‍या व नातेवाईक असलेला फारुख हा तस्कर डॉन दाउद इब्राहिमचा विश्‍वासू छोटा शकीलशी संबंधीत आहे. त्याच्याच सांगण्यावरून तो शारजावरून पाकिस्तानात दहशवादी प्रशिक्षणासाठी गेला होता. आरोपीच्या चौकशीत, तो मुंबईसह गुजरात व उत्तर प्रदेशात दहशतवादी घातपाती कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजले आहे. 

फारुख हा देशातील वॉन्टेड आरोपींपैकी एक असून त्याच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सूचनेरून ‘इंटरपोल’ने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. फारुख हा मुंबई व इतर शहरांमधील तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता. दाउद टोळीचे गुजरातमधील काम एकेकाळी फारुख सांभाळायचा. त्याच्याविरोधात ‘पोटा’ कायद्यांतर्गत अहमदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिर्झाचे मुंबईहून शारजाला जाण्यासाठी विमान तिकीट फारुखनेच पाठवले होते.

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात?
शारजाला राहिल्यानंतर मिर्झा कराचीला गेला होता. पण त्याचे तिकीट आणि व्हिसा थेट कराचीचा नव्हता. त्याचे तिकीट कराचीमार्गे दुसऱ्या देशात जाणाऱ्या विमानाचे होते; पण मिर्झाला त्याच्या म्होरक्‍यांनी कराचीत उतरण्यास सांगितले होते. तेथे उतरल्यावर मिर्झाला कायदेशीर कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तानातील स्थानिक यंत्रणांचेही दहशवाद्यांना मदत केली, हे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी आरोपींना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने मदत केल्याचे बोलले जाते.

Web Title: faijal mirza D company link terrorist