सिट बेल्ट बांधण्याच्या उदासिनतेमुळे अनेकांचा मृत्यू

vehicle seat belt
vehicle seat beltsakal
Summary

उद्योजक आणि टाटा उद्योगसमुहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूंनंतर वाहनातील सिट बेल्टच्या सुरक्षेबाबत दाखवल्या जाणाऱ्या अक्षम्य हलगर्जीपणाचा या निमित्ताने पुढे आला आहे.

मुंबई - उद्योजक आणि टाटा उद्योगसमुहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूंनंतर वाहनातील सिट बेल्टच्या सुरक्षेबाबत दाखवल्या जाणाऱ्या अक्षम्य हलगर्जीपणाचा या निमित्ताने पुढे आला आहे. सायरस मिस्त्री प्रवास करत असलेल्या मर्सिडीजमध्ये चार जण प्रवास करत होते. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे हे मागच्या सिटवर बसले होते. या दोघांनीही सिट बिल्ट बांधले नव्हते असे पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पुढच्या सिटवर बसलेल्या दोघांनी सिट बेल्ट बांधल्यामुळे ते बचावले. देशभरात रस्ते अपघातात दरवर्षी साडे तीन लाखाच्या वर व्यक्तींचा मृत्यू होतो. मात्र यातील अनेक मृत्यू सिट बेल्ट न लावल्यामुळे होतात. मात्र सिट बेल्ट न बांधण्याची मानसिकता ऐरणीवर आली आहे.

वाहन निर्मीती क्षेत्रातील उद्योजक डॉ. सुधीर मेहता यांच्या मते वाहनांमध्ये कितीही अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवल्या तरी त्या वापरण्याची मानसिकता नागरिकांमध्ये असणे महत्वाचे आहे. आपल्याकडे सिट बेल्ट वापरण्याची मानसिकताच नाही. सिट बेल्ट लावल्याशिवाय एअर बॅग निघत नाही. जुगाड टेक्नालॉजीचा वापर करून सिट बेल्टच्या इंडिकेशनचा आवाज बंद करणे आपल्याकडे स्मार्टगीरी समजली जाते.

ज्याप्रमाणे दुचाकी वाहनांवर हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे, त्या प्रमाणे चारचाकी वाहनांमध्ये सिट बेल्टचा वापर अत्यावश्यक आहे. मागच्या सिटवरील सिट बेल्ट लावावी लागते हेच अनेकांना माहिती नाही. बेबीसीट आणि मागच्या सिटवरील सिटबेल्टचा वापर हा करायलाच हवाय. त्यामूळे अनेकांचे प्राण वाचू शकते. मात्र आपल्याकडे हेल्मेट सक्तीला विरोध करण्याची मानसिकता आहे.

आता पालकांकडून आपल्या मुलांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शिकवण देणे आता गरजेचे आहे.

मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सुरक्षेसाठी मोहीम चालवणारे तम्नय पेंडसे यांच्या मते मुंबई-पुणे दोन्ही शहरांमधील वाहनांची गर्दी वाढली आहे. द्रुतगती महामार्गावर आपल्याला अडवणारे कोणीही नाही असे समजून वाहन चालक बेदरकारपणे गाड्या चालवतात. गेल्यावर्षी मुंबई-पुणे दृतगती मार्गावर धावणाऱ्या वाहनांची सरासरी वेग 120 ते 160 प्रती तास असल्याचे आढळून आले होते. आखून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा ती जास्त आहे.

वाहन चालकाची मानसिकता त्यानंतर ओव्हरस्पिडींग आणि रात्रीचा प्रवास टाळणे तिन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. कारमध्ये मागच्या सिटवरचे सिटबेल्ट न वापरण्याची प्रथाच आपल्याकडे पडली आहे. दुसरी बाब म्हणजे वाहतूकीचे नियम मोडल्यास फक्त दंडच होईल, अशी बहुतांश वाहनचालकांची मानसिकता आहे. अशा वाहनचालकांना दंड न करता, तिन तास बसवून ठेवण्याची शिक्षा दिल्यास पुढच्या वेळी नियम मोडतांना ते वाहन चालक शंभरवेळा विचार करतील.

माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी 90 टक्के अपघात चालकांच्या चुकींमुळे होत असल्याचे सांगीतले. मात्र तरीही सरकार प्रशिक्षित चालकांची निर्मीती करण्यासाठी उस्तुक नसल्याचे ते म्हणाले. चालकाला परवाना देतांना वाहतुकीच्या नियमांची माहिती, तो किती चांगले वाहन चालवतो हे तपासणे महत्वाचे आहे. मात्र वाहन परवाना देणाऱ्या परिवहन विभागाची यंत्रणेत अनेक दोष आहे. आखाती देशात ड्रायविंग लायसंन्स मिळण्यासाठी वर्षांनुवर्ष जाते. भारतात मात्र, एजंट कडे गेल्याबरोबर पैसे मोजताच लायसंन्स दिल्या जाते ही शोकांतीका आहे. आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसंन्सच्या परिक्षेत 100 टक्के चालक पास होतांना दिसून येत आहे. वाहतुक नियम मोडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा वाहतुकीचे नियमच चालकांकडून मोडल्या जाणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

यापुर्वी फक्त वाहनाचे पुढचे सिटबेल्ट लावणे बंधनकारक होते. वाढलेले अपघात बघता आता वाहनाच्या मागच्या सिटवर बसणाऱ्यांना सिटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. मात्र, नियम कितीही कठोर केले तरी फायदा नाही, शेवटी नागरिकांची मानसिकता महत्वाची आहे. त्यामुळे स्वयमशिस्तीची गरज आहे. असं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com