बनावट डॉक्टर बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पाच आरोपींना अटक; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपर्यंत जाळे

Navi Mumbai Crime: बनावट डॉक्टर तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचे जाळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरल्याचे समोर आले आहे.
Crime

crime

Esakal

Updated on: 

नवी मुंबई : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊनही एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे मिळवून देत डॉक्टर बनविण्याचा प्रयत्न करणारे आंतरराज्य रॅकेट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदणी प्रक्रियेत बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या २२ विद्यार्थ्यांचे प्रकरण तपासात समोर आले आहे. या रॅकेटमधील दोन डॉक्टरांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशपर्यंत या रॅकेटचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...