कोरोनाची लस आल्यावर नागरिकांना देण्याचा प्राधान्यक्रम कसा राहील ? स्वतः राजेश टोपे यांनी दिली माहिती

सुमित बागुल
Friday, 27 November 2020

कोरोनाची संवेदनशील परिस्थिती अजूनही कायम आहे. दिवाळीमध्ये झालेली कमालीची गर्दी आणि त्यांनतर कोरोनाचे वाढते आकडे चिंता वाढवणारे आहेत

मुंबई : कोरोनाची संवेदनशील परिस्थिती अजूनही कायम आहे. दिवाळीमध्ये झालेली कमालीची गर्दी आणि त्यांनतर कोरोनाचे वाढते आकडे चिंता वाढवणारे आहेत. अशात कोरोनाची पुन्हा लाट येऊ शकते अशी शक्यता निर्माण होतेय. मात्र अशात एक आशेचा किरण ठरतोय तो म्हणजे येऊ घातलेली कोरोनाची लस. ही लस आपल्याला कधी मिळणार, लस किती प्रभावशाली आहे, लस घेल्यावर आपल्याला कोरोना होणारच नाही का ? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडलेत. यावर आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः उत्तर दिलंय. एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.        

महत्त्वाची बातमी : "तुम्ही व्हिलनची भूमिका निभावली म्हणूनच मी हिरो बनू शकले"; न्यायालयाच्या निकालांनंतर कंगनाची प्रतिक्रिया

याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की, "लसीच्या संदर्भात आपण अपेक्षा करत आहोत की लवकर वॅक्सीन यावं. प्रधानमंत्री देखील उद्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. लस बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा त्यामागील उद्देश आहे. आपल्या देशात पाच कंपन्या लसीवर काम करत आहेत. यातील दोन कंपन्या सरकारी असून तीन खासगी कंपन्या आहेत. बाहेर देशातील विविध युनिव्हर्सिटी आणि तज्ज्ञांच्या संपर्कात राहून त्यांचा रिसर्च सुरु आहे. आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर लस यावी. मात्र, लस कधी येईल याची शाश्वती नाही. मात्र लस येण्याच्या आधीची पूर्वतयारी अत्यंत व्यवस्थित सुरु आहे.

महत्त्वाची बातमी : ED ने तयार केला कोठडी अहवाल, प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढणार ?

त्यामध्ये रेफ्रिजरेशनचा विषय आहे. लसीला उणे तापमानात ठेवावं लागतं, तर ते किती कमी तापमानात ठेवायला हवं त्याची माहिती गोळा करणे सुरु आहे. त्याचसोबत फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्याने  वॅक्सीन द्यावं अशा केंद्राच्या सूचना आहेत. त्यामुळे त्याचाही डेटा गोळा करण्याचं काम सुरु आहे. डॉक्टर्स, पोलिसकर्मी, अत्यावश्यक सेवेतील माणसं यांचा डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरु आहे. यासोबतच जे ५० वर्षांच्या वरील कोमॉर्बिडीटी असलेल्या रुग्णांचा डेटा तयार केला जातोय.  माझी जबाबदारी या अंतर्गत आपण हा डेटा जमा करतोय. त्यामुळे आपल्या या समाजातील भागाची आपण अधिक काळजी घेतली पाहिजे, कारण तिथे जर कोरोना झाला तर सदर माणूस दगावण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तिथे लसीकरण लवकर केलं जाईल. मात्र, लसीचा परिणाम किती महिने राहील, किती वर्ष राहील याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. वॅक्सीन घेतलं म्हणजे आपण कायमचे बरे झालो असं म्हणता येणार नाही. त्याचा अनुभव घेऊन पाहावं लागेल", असंही राजेश टोपे म्हणालेत.  
what would be the priority of giving corona vaccine to people health minister rajesh tope explained


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what would be the priority of giving corona vaccine to people health minister rajesh tope explained