esakal | फेक टीआरपी प्रकरण! गुन्हे शाखेकडून विरार येथून एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

फेक टीआरपी प्रकरण! गुन्हे शाखेकडून विरार येथून एकाला अटक

फेक टीआरपी गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला विरार येथून अटक केली

फेक टीआरपी प्रकरण! गुन्हे शाखेकडून विरार येथून एकाला अटक

sakal_logo
By
अनिश पाटील

 
मुंबई - फेक टीआरपी गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला विरार येथून अटक केली. ही याप्रकरणातील सहावी अटक करून आरोपींचा संबंध आर्थिक व्यवहाराशी असलल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत सावळा गोंधळ; राज्याची घोषणा, रेल्वेचा मात्र नकार 

उमेश मिश्रा असे अटक आरोपी आहे. आरोपी मार्फत एका वृत्तवाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी पैसे येत असल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची व व्यवहारांची तपासणी होणार आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 1,823 कोरोना रुग्णांची वाढ; तर रुग्ण दुपटीचा दर 82 दिवसांवर 

रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या  यांची नावे याप्रकरणी आली आहे. याशिवाय आणखी वाहिन्यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण त्याबाब अद्याप ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी स्कॅम प्रकरणात 40 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )