मुंबईत गेल्या 24 तासात 1,823 कोरोना रुग्णांची वाढ; तर रुग्ण दुपटीचा दर 82 दिवसांवर

मिलिंद तांबे
Friday, 16 October 2020

मुंबईत आज 1,823 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,38,548 झाली आहे. मुंबईत आज 37 रुग्णांचा मृत्यू झाला

मुंबई : मुंबईत आज 1,823 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,38,548 झाली आहे. मुंबईत आज 37 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,635 वर पोचला आहे. मुंबईत आज 1644 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,05,111 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 86 टक्के इतका झाला आहे.

BMCच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेत खडाजंगी; परस्पर मत बाद केल्याचा महापौरांवर आरोप

बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 18,010 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 1,061 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 645 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,905 इतकी आहे. 
मुंबईत आज नोंद झालेल्या  37 मृत्यूंपैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 26 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 46 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. 19 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 26 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.                 

अतिवृष्टीग्रस्तांसाठी क्रॉस कनेक्शन! भाजपची मुख्यमंत्र्यांकडे तर काँग्रेसची नरेंद्र मोदींकडे मागणी

आज 1,644 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 2,05,111 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 82 दिवसांवर गेला आहे. तर 15 ऑक्टोबर पर्यंत एकूण 13,25,537  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.85 इतका आहे. 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So the patient double rate every 82 days in mumbai