फेक टीआरपी प्रकरण : रिपब्लिकच्या दाव्याची गुन्हे शाखेकडून पडताळणी

अनिश पाटील
Wednesday, 14 October 2020

खोट्या टिआरपी प्रकरणात बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे अँकर निरंजन नारायणस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

मुंबई : खोट्या टिआरपी प्रकरणात बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे अँकर निरंजन नारायणस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत याप्रकरणी सुमारे 40 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हंसा कंपनीच्या एका कागदपत्राच्या आधारे पोलिस चुकीची कारवाई करत असल्याचा दावा 10 ऑक्टोबरच्या एका शोमध्ये निरंजन यांनी केला होता. हे कागदपत्र खोटे असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

टिआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिककडून वारंवार पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. याच दरम्यान रिपब्लिकने 10 ऑक्टोबरला एका शो मध्ये हंसाचा रिपोर्ट असल्याचे सांगत, त्या रिपोर्टमध्ये कुठेही रिपब्लिकचे नाव नसल्याचे सांगितले जात होते. तसेच तो रिपोर्ट हा मुंबई पोलिसांच्या तपासातील महत्वाचा दस्तावेज असून तो लिक झाला असल्याचा दावा केला गेला होता.

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

चॅनेलवर अँकर निरंजन नारायण स्वामी ही माहीत देत होता. मात्र या रिपोर्टवर कोणतीही तारीख अथवा कुणाचे नाव नव्हते. तसेच या रिपोर्टबाबत तक्रारदार आणि हंसा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर नितीन देवकर यांच्याकडे चौकशी केली आहे. मात्र या रिपोर्टमध्ये तथ्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून याच संदर्भात निरंजन स्वामी याला चौकशीला बोलावले होते.

स्वामी यांना संबंधीत कागदपत्र घेऊन गुरूवारी गुन्हे शाखेने बोलावले आहे. याप्रकरणी गुरूवारी रिपब्लिकचे सीएफओ एस सुंदरम यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. वैद्यकीय कारणामुळे ते गुन्हे शाखेच्या चौकशीला उपस्थित राहू शकले नव्हते. दरम्यान याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

याप्रकरणी उत्तर प्रदेशातून अटक आरोपी विशाल भंडारीकडून जप्त केलेल्या डायरीतून काही अन्य वाहिन्यांची नावेही पुढे आली आहे. या डायरीत शेकडो नागरिकांना विविध चॅनेल पाहण्यासाठी पैसे दिल्याचे आणि पैशांचा व्यवहाराबाबत माहिती लिहून ठेवल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत. 

fake TRP case crime branch investigation updates and overall case updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake TRP case crime branch investigation updates and overall case updates