फेक TRP प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, BARC India चे माजी COO रोमिल रामगरहिया अटकेत

राजू परुळेकर
Thursday, 17 December 2020

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने टीआरपी प्रकरणात 14 आरोपींना गजाआड केले असून यापूर्वीच पोलिसांनी न्यायालयात 12 आरोपींच्या विरोधात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल ककेलेलं आहे.

मुंबई :  TRP गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात सहभागी असलेल्या तब्बल 13 आरोपीना अटक केली. आज या प्रकरणी 14 व्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी रोमिल रामगरहिया यांना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना 37 व्या न्यायालयात हजार करण्यात आले. आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने सुनावले आहेत.

रोमिल रामगरहिया हे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच BARC या TRP मोजणाऱ्या  संस्थेचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजेच COO होते. फेक TRP प्रकरणात बार्क संस्थेशी निगडित कुणालाही अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जून २०२० मध्ये रोमिल यांनी बार्क इंडिया संस्थेच्या COO पद सोडलं. त्यांनी सहा वर्ष या संस्थेत काम केलं आहे.  

महत्त्वाची बातमी : NCB ने हस्तगत केलेत अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाचे चॅट्स; चॅट्समधून धक्कादायक माहिती उघड

टीआरपी घोटाळा प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 13 वा आरोपी  रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी यांना अटक केली होती. तत्पूर्वी खानचंदानी यांची यापूर्वीच दोनवेळा चौकशी करण्यात आलेली होती. त्यानंतर पोलीस पथकाने आता 14 वा आरोपी रोमिल रामगरहिया यांना अटक केली असून गुन्हे शाखा पथक अधिक चौकशी करीत आहे.

महत्त्वाची बातमी : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अघोरी जादूटोणा, दोघे जण अटकेत

टीआरपी घोटाळ्यात केबल ऑपरेटर यांनी एलसीएनचा वापर केल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने टीआरपी प्रकरणात 14 आरोपींना गजाआड केले असून यापूर्वीच पोलिसांनी न्यायालयात 12 आरोपींच्या विरोधात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केलेलं आहे. त्यानंतर 13 वा आरोपी विकास खानचंदानी आणि 14 वा आरोपी रोमिल रामगरहिया हे असून त्यांच्या चौकशीत काय माहिती मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

( संपादन - सुमित बागुल )

fake trp case ex coo of barc india Romil Ramgarhia is under arrest by Mumbai Police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake trp case ex coo of barc india Romil Ramgarhia is under arrest by Mumbai Police crime branch