शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अघोरी जादूटोणा, दोघे जण अटकेत

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अघोरी जादूटोणा, दोघे जण अटकेत

मुंबईः ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हा जादुटोणा करणाऱ्यांवर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केलीय. 

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलिस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात हा सर्व प्रकार सुरु होता. त्या घरात तांदळामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. अटक केलेली इसम हे अशा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ अटक केली. कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरोधात भांदवि कलम 420, 34 फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 च्या कलम 2(1) (ख), (2) (3), 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Shivsena leader eknath shinde thane Black Magic jawhar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com