फेक TRP प्रकरणाचा तपास CBI कडे वर्ग करा, हायकोर्टात याचिका

सुनीता महामुणकर
Wednesday, 17 February 2021

फेक टीआरपी प्रकरण: राज्य सरकार आणि मुंबई पोलिस रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करत आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

मुंबई: फेक टीआरपी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील सामाजिक संस्थेने केली आहे. राज्य सरकार आणि मुंबई पोलिस रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करत आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

पुण्यातील पुणेकर नागरिक कृती समितीच्यावतीने मंगळवारी न्यायालयात याचिका करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये सीबीआय फेक टीआरपी प्रकरणात तपास करत आहे. मात्र महाराष्ट्रात राज्य सरकारने सीबीआयला थेट तपास करायला मनाई केली आहे. त्यामुळे सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर हा तपास न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.

हेही वाचा- 11 वी प्रवेश मुदतवाढ संपली, तब्बल इतके 'हजारो' विद्यार्थी आहेत प्रवेशापासून दूर

मुंबई पोलिस जाणीवपूर्वक रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करत आहेत. पण इंडिया टुडे वृत्तवाहिनीविरोधात तपास करत नाही. इंडिया टुडेचा उल्लेख फिर्यादीमध्ये असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपासही सीबीआय करत आहे. मुंबई पोलिस अनेक प्रकरणात आवश्यक तसा तपास आणि कलमे लावत नाही. त्यांच्या मर्जीप्रमाणे मीडियाने चालायला हवे. असेच ते सुचवत आहेत, असा आरोपही याचिकादारांनी केला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असून सीबीआय तपासासाठी ते एक उत्तम कारण आहे, असा दावा याचिकेत केला आहे. बुधवारी याचिकेवर मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. फेक टीआरपी प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून काही जणांना अटक केली आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fake TRP case Should transfer CBI demand Petition filed bombay high court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake TRP case Should transfer CBI demand Petition filed bombay high court