...'चक्क' त्यांनी लोकप्रतिनिधींचीच केली दिशाभूल! वाचून तुम्हीही चक्रवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

खारघर वसाहतीतील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत शेकाप आघाडीच्या वतीने जानेवारी महिन्यात धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी खारघर, सेक्‍टर  २, ५ ते ८, ११, १७ ते १९ मधील रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे असे लेखी पत्र सिडको अधिकाऱ्यांनी दिले; मात्र सेक्‍टर १६ ते १९ वगळता इतर सेक्‍टरमधील रस्त्याचे डांबरीकरण झाले नसून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे.

खारघर : खारघर वसाहतीतील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत शेकाप आघाडीच्या वतीने जानेवारी महिन्यात धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी खारघर, सेक्‍टर  २, ५ ते ८, ११, १७ ते १९ मधील रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे असे लेखी पत्र सिडको अधिकाऱ्यांनी दिले; मात्र सेक्‍टर १६ ते १९ वगळता इतर सेक्‍टरमधील रस्त्याचे डांबरीकरण झाले नसून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे.

ही बातमी वाचली का? सतत चिडवायचा म्हणून आवळला शेजारचा मुलाचा गळा 

खारघर, सेक्‍टर १६ ते १८ मधील बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे; मात्र सेक्‍टर १९ मध्ये रिलायन्स फ्रेशकडून सत्याग्रह महाविद्यालयाकडे जाणाऱ्या आणि मुर्बी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच सेक्‍टर ७ मध्ये युवा संस्थेकडून सेक्‍टर ११ तसेच हिरानंदानी आणि हार्डरॉक सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. सेक्‍टर ११ मध्ये शनिमंदिरासमोर आणि रेयॉन इंटरनॅशनलच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खारघर, सेक्‍टर ५ मधील लक्ष्मी मंदिराकडून मित्र हॉस्पिटल आणि हार्मोनी स्कूलकडून उत्सव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

ही बातमी वाचली का? गरिबांचा फ्रि़ज महागला

या मार्गावर शाळा, महाविद्यालये असल्यामुळे मुलांना सोडायला येणाऱ्या पालकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागत आहे. नागरिकांकडून मिळालेल्या माहिनुसार सिडकोने गेल्या वर्षभरात रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम केले नाही. त्यामुळे सिडकोविरोधता तीव्र संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सिडकोने सेक्‍टर ५ मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. एक-दोन ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करणे म्हणजे रस्ते डांबरीकरण नाही. सिडकोने लेखी दिलेली माहिती खोटी आहे.
- हर्षदा उपाध्याय, नगरसेविका. 

ही बातमी वाचली का? बंदीनंतरही 'या' माशाला मिळतीये खवय्यांची पसंती! 

खारघरमधील सिडको अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना काही सेक्‍टरमध्ये रस्त्यांचे काम झाले नसताना खोटी माहिती लिहून दिली आहे. याविषयी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून सत्यस्थिती नजरेस आणून देणार आहे.
- गुरुनाथ गायकर, नगरसेवक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False information of CIDCO officials regarding road repairs Misleading people's representatives in Kharghar