कोरोनामुळे दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मिळणार मदतनिधी; महापौरांनी घेतली दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori Pednekar

कोरोनामुळे दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मिळणार मदतनिधी; महापौरांनी घेतली दखल

मुंबई : कोरोनामुळे दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मदतनिधी मिळणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली. सरकारी नियमांप्रमाणे कोविडने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. मात्र,अनेकांपर्यंत तो मदत निधी पोहचला नसल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात सोमवारी महापौर बंगल्यावर जनसुनावणी होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा: पोलीसांना अपशब्द वापरल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक

मुंबई महापालिकेने नारायण राणेंना (Narayan Rane) नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बाधकामाची मोजणी करण्यासंदर्भात ही नोटीस बजावली आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रीया दिली. त्या म्हणाल्या,“जे सरकारी नियम आहेत त्याचे उल्लंघन झाले असेल तर त्या अंतर्गत पालिकेकडून कारवाई होईल. मी याबाबत अधिक माहिती घेईन आणि पुन्हा बोलेन”

Web Title: Families Of Dead People Due To Corona Will Get Relief Fund Mayor Kishori Pednekar Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top