अल्पवयीन मुलीवरील अत्याचार दडवल्याप्रकरणी कुटुंबीय अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मानखुर्द  - अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा दडवून ठेवल्याप्रकरणी देवनार पोलिसांनी अत्याचार करणाऱ्यासह कुटुंबातील नऊ जणांना; तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांसोबत झालेल्या वादामुळे अन्य पाच जणांनाही रविवारी (ता. 6) अटक केली. गोवंडीच्या टाटानगरमध्ये मार्चमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. पीडित मुलगी व अत्याचार करणारा हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. 

टाटानगर परिसरात दोघे मावस भाऊ सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यातील एकाच्या मुलाने दुसऱ्या भावाच्या अल्पवयीन मुलीवर मार्चमध्ये अत्याचार केले होते. याविषयी मुलीच्या कुटुंबीयांना कळताच मुलीच्या औषधोपचाराचा पूर्ण खर्च देण्याचे आश्वासन देऊन मुलाच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण दडपले. रविवारी या दोन्ही मावस भावांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. वादावादीतून एकमेकांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत हाणामारीही झाली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने अत्याचार करणाऱ्या मुलाच्या कुटुंबीयांविरोधात केलेल्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीवरून मारहाण केल्याच्या आरोपात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्ही कुटुंबातील मिळून 13 जणांना देवनार पोलिसांनी अटक केली आहे. देवनार पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Family detained for breaching atrocities on minor girl