Mumbai Crime : पत्नीवर चाकूने वार करून पतीची आत्महत्या; मुलुंडमधील घटना

मुलुंड पूर्व येथे गुरुवारी सायंकाळी 64 वर्षीय व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
Mumbai Crime
Mumbai Crime esakal
Summary

मुलुंड पूर्व येथे गुरुवारी सायंकाळी 64 वर्षीय व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

मुंबई : मुलुंड पूर्व येथे गुरुवारी सायंकाळी 64 वर्षीय व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपी शिवन पिलानी या मृत पतीविरुद्ध पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पिडीत 54 वर्षीय पत्नी कविता पिलानी मुलुंडमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना शिवन पिलानी यांच्या मुलीमुळे उघडकीस आली. ही घटना घडली तेव्हा त्यांची मुलगी धन्या घरी नव्हती. सायंकाळी 5.30 च्या सुमारास धन्या घरी परतली असता तिला दरवाजा आतून बंद दिसला. तिने बेल वाजवली मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. तसेच तिच्या आईच्या मोबाईल फोनवर अनेक वेळा फोन केला.

मात्र धन्याला घरातून फोनची रिंग ऐकू आल्याने तिला संशय आला. अखेर तिने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा ते दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, परंतु सुदैवाने जिवंत होती. तिने वडिलांचा शोध घेतला असता बेडरूमचे कुलूप आतून बंद होते. ते उघडले असता वडील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी शिवन पलानी यांना मृत घोषित केले, तर कविताला मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. शिवनला मानसिक आजार होता आणि त्याला काही महिन्यांपूर्वी पुनर्वसनासाठी पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. नवघर पोलिसानी मृत झालेल्या शिवन विरुद्ध आयपीसी कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com