कौटुंबिक कलह, ताण-तणाव घडवितात 'आत्महत्या' 

कौटुंबिक कलह, ताण-तणाव घडवितात 'आत्महत्या' 

ठाणे : आत्महत्येचे विचार डोक्‍यात घोंगावणे हा एक मानसिक आजार आहे. कौटुंबिक कलह, ताण-तणाव यामुळे सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. या विचारांपासून व्यक्तीला परावृत्त करण्याचे काम ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार कक्ष करीत आहे.

आत्महत्या करण्यामध्ये महिलांची संख्या अधिक असून, चालू वर्षात 87 जणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम या विभागाने केले आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आज जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. 
आपण दररोज वृत्तपत्रांच्या माध्यमातून आत्महत्येच्या बातम्या वाचत असतो. सेलिब्रिटी, व्यावसायिक, पोलिस यांसारख्या विविध क्षेत्रांतील लोक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू लागली आहेत. हरवलेला संवाद, एकटेपणा, स्पर्धा, ताण-तणाव अशा अनेक कारणांमुळे व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलते.

आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात सुरू असतात. तेव्हाच त्याला मानसिक आधार, उपचारांची गरज असते हे नागरिकांनी विचारात घेतले पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार विभाग तीन-चार वर्षे याविषयी जनजागृती करत आहे. रुग्णांना औषधांसोबत मानसिक उपचारांची गरज असते. येथे येणारा रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. त्याला त्या विचारांपासून परावृत्त करणे, त्याच्या प्रश्‍नांची उकल करणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त करणे अशी आवाहने आमच्यासमोर असतात. अशा व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आत्महत्येचा विचार ते करणार नाहीत. त्यामुळे अशावेळी घरातील व्यक्ती, मित्र परिवार किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी येऊन संवाद साधावा, अशी माहिती मानसोपचार विभागाच्या वतीने देण्यात आली. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार विभागात मानसोपचार चिकित्सक डॉ. रोहिल्ला, मानसशास्त्रज्ञ जीनी पटनी, परिसेविका गौतमी म्हसकर, समाजसेवा अधिकक्ष श्रीरंग सिद यांचे पथक अशा रुग्णांवर उपचार करते. त्या अशा प्रकरणांत रुग्णालयातील मानसोपचार विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विभागाच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रम आखले जातात. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्तही जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीरंग सिद यांनी दिली. 

2017 (जानेवारी ते डिसेंबर) 2018 (जानेवारी ते ऑगस्ट) 

महिला 85 57 

पुरुष 32 30 

एकूण 117 87 

आत्महत्येची प्रमुख कारणे 

कौटुंबिक समस्या, आजार, व्यसनाधीनता, प्रेमभंग, मानसिक आजार, नैराश्‍य, आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, गरिबी, हुंडाबळी, कौटुंबिक वाद, बदनामी. 

आत्महत्या रोखण्यासाठी उपाय 

आत्महत्येसंदर्भात समाजात जनजागृती करणे, व्यसनांपासून दूर राहणे, शाळा, महाविद्यालयांत समुपदेशक नेमणे, कौटुंबिक हिंसाचार थांबवणे, सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे, कौटुंबिक संवाद वाढविणे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com