कराची विमान अपघातात झारा आबिद या प्रसिद्ध मॉडलचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 23 May 2020

प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल झारा आबिद हीचा मृत्यू झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणाऱ्या या विमानातून झारा देखील प्रवास करत होती.

मुंबई : पाकिस्तान  इंटरनॅशनल एअरलाइन्सचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराचीला जात होतं. या विमान अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) एक विमान कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी दाट लोकवस्ती असलेल्या रहिवाशी भागात जाऊन कोसळले. यामध्ये १०० जण ठार झाले. या अपघातात एका प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेलने जीव गमावला आहे. 

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

या भीषण अपघातात प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल झारा आबिद हीचा मृत्यू झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणाऱ्या या विमानातून झारा देखील प्रवास करत होती. झाराच्या काकांचे निधन झाल्याचे तिला कळले होते. त्यामुळे ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाहोरहून कराचीला जात होती. मात्र दुर्दैवाने विमानाच्या अपघातात झाराचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पत्रकार झैन खान यांनी ट्विटरवर पोस्ट करत झाराच्या मृत्यूबाबतची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. 

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी! शालेय शिक्षणाबाबत निती आयोगाने प्रसिद्ध केला अहवाल; वाचा राज्याची क्रमवारी

पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर झाराला श्रद्धांजली वाहिली आहे. पाकिस्तानी प्रसिद्ध फॅशन डिझायनर खादिजाह शाहने ट्विट करत झारला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'फॅशन इंडस्ट्रीने विमान अपघातात झारा आबिदला गमावलं. ती खूप कष्ट करणारी मुलगी होती. तिच्या आत्म्यास शांती लाभो.' यानंतर अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. 
झारा लाहोरमध्ये एक कपड्यांच्या ब्रँडसाठी फॅशन शो करत होती. ती खासकरून पारंपरिक पोशाखातील मॉडेलिंगसाठी प्रसिद्ध होती. झारा सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. तिच्या निधनानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेली शेवटची पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. यामध्ये ती हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसून येते आहे. आणि त्यावर तिने ' फ्लाय हाय, इट्स गूड' असे कॅप्शन टाकले आहे. 

...म्हणून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन नाही; उड्डानमंत्र्यांचा अजब निर्णय

लाहोरहून उडालेले हे विमान कराची विमानतळावर लँड व्हायला काही मिनिटांचा कालावधी बाकी होता. विमान लँड होण्याआधी विमात काही तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यावेळचे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यामधील संभाषणाची रेकॉर्डिंग देखील समोर आली आहे. यामध्ये पयलटने विमानात तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले होते. या विमानात ९१ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous model Zara Abid dies in Karachi plane crash