फरहान आझमींची उद्धव ठाकरेंना धमकी, म्हणालेत..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

मुंबई - महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे  नेते अबू आझमी यांच्या मुलाने मोठं वक्तव्य केलंय. फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण होतायत, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ७ मार्चला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे अयोध्येला गेलेत तर मी सुद्धा अयोध्येला जाईन, 'ते राम मंदिर बांधतील आपण मशीद बांधू' असं फरहान आझमी म्हणालेत.   

मोठी बातमी - भाजपाला मोठं खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मेगाप्लान..

याबाबत बोलताना आझमी म्हणालेत “मी इशारा देतो, याला धमकी समजा किंवा काहीही समजा, पण मला विनम्रपणे सांगायचं आहे की, जर उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून म्हणत असतील की 7 मार्चला आपण अयोध्येला जाणार. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचं तिकीट काढलं, तर आम्ही इकडून पायी अयोध्येसाठी जाऊ. आम्ही सर्वजण सोबत जाऊ. मात्र एक अट असेल, ते राम मंदिराची निर्मिती करतील, आम्ही बाबरी मशीद बांधू”. अयोध्या दौरा करुन तुम्ही महाराष्ट्रातील  मुस्लिम, दलित, अल्पसंख्याक, त्याचसोबत धर्मनिरपेक्ष हिंदूंना धमकावत आहात. १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल सिद्धिविनायकाला का जात नाहीत ? तिथे तुमची आस्था कमी होते का ? असा सवाल देखील फरहान आझमी यांनी विचारलाय. 

मोठी बातमी - चीनची आणखी एक वाहन कंपनी भारतात धुमाकूळ घालणार 

दरम्यान महाराष्ट्रातील सरकार सहा ते आठ महिन्यांच्यावर चालेल असं वाट नसल्याचंही आझमी म्हणालेत.

farhan aazmi made controversial statement about uddhav thackeray and visit of ayodhya  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farhan aazmi made controversial statement about uddhav thackeray and visit of ayodhya