डहाणू तालुक्यातील शेतकरी इजराईलच्या कृषी अभ्यास दौऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

बोर्डी - राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत डहाणू तालुक्यातील तीन शेतकरी इजराईल देशाच्या कृषी दौऱ्यावर जात आहेत. यात त्या देशातील प्रगत व विकसित शेतीचा अभ्यास करणार आहेत. तसेच शेतीवर आधारित विविध प्रकल्पाची पाहणी करुन तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहेत.

डहाणू तालुक्यातिल जामशेत, नरपड, कंक्रडी या गावातील स्नेहल अनंतराव पोतदार, देवेंद्र गोविंद राऊत, प्रवीण वासुदेव बारी हे तीन शेतकरी 22 ते 28 फेब्रुवारी 2019 या सात दिवसाच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहेत. सात दिवसाच्या या अभ्यास दौऱ्यासाठी राज्य शासनाकडून 60 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित 60 हजार 500 रुपयांचा खर्च स्वतः शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. 

या दौऱ्यात शेतकऱ्यांना इजराईल देशाने शेतीमध्ये केलेल्या विविध आधुनिक  प्रयोगाची माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानातून शेतीमध्ये केलेल्या संशोधनासह यांत्रिकीकरणासह अवगत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, इजराइल देशातील शेतकऱ्यांनी शेतीला विकसित करून जगापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. बदलत्या वातावरणात व यंत्राच्या मदतीने शेती प्रगत करण्याचे तंत्रज्ञान या देशाच्या शेतकऱ्यांनी प्राप्त केले आहे.

Web Title: Farmers from Dahanu taluka on Israeli agricultural studies tour