
बोर्डी : कर्ज वाटपाचे काम लांबल्याने शेतकरी बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच कोलमडले आहे. सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी संस्थांतर्फे लवकरात लवकर कर्जवाटप करण्यात यावे, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारी पन्नास हजार रुपयांची भरपाई तातडीने खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
महत्वाची बातमी : आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..
30 मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी मागील वर्षातील कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत, दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना अनामिक पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. मात्र चालू वर्षी 23 मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने बँका, सहकारी संस्थांमध्ये कर्मचारी वर्ग कामाला येऊ शकत नसल्याने कर्जाची प्रकरणे रेंगाळली आहेत. भाजीपाला बाजार, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडल्यामुळे मालाची विक्री न झाल्याने त्याची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांना दागिने गहाण टाकण्याची वेळ आली आहे, तर अनेकांसमोर सावकारी कर्ज घेण्याशिवाय इतर पर्याय उरलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर कर्ज प्रकरणे मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बोर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Farmers in financial difficulties due to non-payment of loans
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.