
Marathwada Flood
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : ‘‘उभी पिकं डोळ्यासमोर वाहून गेली. कोठारातील धान्य कुजून वाया गेलं. घरं आणि जनावरं पाण्यात... आयुष्यभर घाम गाळून उभं केलेलं स्वप्न क्षणभरात कोसळलं.’’ अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश ‘सकाळ’शी बोलताना उमटला. शेतकऱ्यांची ही वेदना संपूर्ण राज्य अनुभवत आहे; पण त्यांच्या संघर्षावर सिनेमे काढून लोकप्रिय झालेले मराठी कलाकार मात्र शांत आहेत. आमच्यावर संकटाचे आभाळ कोसळल्यानंतर ते मदतीऐवजी ‘सेल्फ प्रमोशन’ करण्यात व्यग्र असल्याची टीका शेतकरीवर्गातून होत आहे.