फॅशन डिझायनरला मारहाण केल्याचा प्राजक्ता माळीवर आरोप

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

मुंबईः जुळून येती रेशीमगाठी फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधात एका फॅशन डिझायनरने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी प्राजक्ताविरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

डिझायनर जान्हवी मनचंदा हिने हा आरोप केला असून, प्राजक्ताला दिलेले कपडे योग्य नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून तिने मारहाण केल्याचा आरोप जान्हवीने केला आहे. यांसंबधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, प्राजक्ताने तिच्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. जान्हवी माझी फॅशन डिझायनर होती. माझे आणि तिचे कपड्यांवरून वाद झाले हे खरे आहे. पण तिला मी मारहाण केलेली नाही. तिने केलेले आरोप खोटे असल्याचे प्राजक्ताने म्हटले आहे.

जान्हवीने केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी प्राजक्ता माळी विरोधात कलम 323 आणि 404 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: fashion designer janvi manchanda accused actress prajakta mali of assault