
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) टोलनाक्यांवर १ एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. एखाद्या वाहनधारकाने टोलची रक्कम रोख वा अन्य पर्यायांद्वारे भरण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना फास्टॅग सेवेचा अवलंब करावा लागणार आहे.