
Fasting Food Price Hike
ESakal
तुर्भे : हिंदू धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाची सुरुवात सोमवारी (ता. २२) घटस्थापनेने झाली. या सणातील नऊ दिवस-नऊ रात्रींचे महत्त्व लक्षात घेता अनेक महिला-पुरुष भाविक उपवास करतात. या उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या फळे व विविध फराळ पदार्थांच्या भावात वाढ झाल्यामुळे यंदा नवरात्रोत्सवाचा उपवास महाग झाला आहे. तरीही उपवासासाठी तयार खाद्यपदार्थ बाजारात चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत.