आरटीओ परीक्षार्थींचे दुसऱ्या दिवशीही उपोषण 

आरटीओ परीक्षार्थींचे दुसऱ्या दिवशीही उपोषण 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया घेतली होती. मात्र, भरती प्रक्रियेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने निवड प्रक्रिया रद्दचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही आरटीओ परीक्षार्थींचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे. एमपीएससीने सहायक मोटार निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली होती. 

परीक्षेसाठी असलेल्या पात्रतेच्या काही अटी सरकारने 2016 मध्ये एक अध्यादेश काढून जाहीर केल्या. त्यामध्ये आवश्‍यक असलेल्या जड मालवाहतूक परवाना आणि वाहतूक दुरुस्तीचा एक वर्षाचा अनुभव परीविक्षाधीन काळात देण्याची जबाबदारी सरकारने स्वतः घेतली होती. त्यानुसार 70 हजार विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी अर्ज केले. तर त्यापैकी मुख्य परीक्षेसाठी नऊ हजार 870 विद्यार्थी पात्र ठरले. अंतिम निकालात 832 विद्यार्थ्यांची निवड निश्‍चित करण्यात आली. दरम्यान, पदासाठी शिफारस पत्रही देण्यात आले; मात्र या भरती प्रक्रियेविरुद्ध नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकार विरुद्ध निकाल देत, 832 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्दचे आदेश दिले आहे. त्यामुळे एमपीएससीने घेतलेल्या भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला सामावून घेण्यात यावे, आरटीओमध्ये नियुक्ती द्यावी या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. 

अनेकांनी सरकारी, खासगी नोकरी नाकारल्या आणि आरटीओची परीक्षा दिली; मात्र ऐन वेळी निवड प्रक्रिया रद्दचे आदेश आल्याने आमचे व आमच्या कुटुंबीयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आमची जबाबदारी स्वीकारून आम्हाला नोकरी द्यावी. 
- किरण कोलते, उपोषणकर्ता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com