
सदर घटनेनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत.
मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवलीमधील चारकोप भागातील गांधीनगर भागामध्ये राहणाऱ्या एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवलीतील एकाच घरातील वडील आणि दोन मुलींनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर चारकोपमधील गांधीनगर परिसरात खळबळ माजली आहे.
महत्त्वाची बातमी : प्रत्येक आठवड्याला 30 लाखांची ड्रग्स विक्री, मोठा कालाचिठ्ठा झाला उघड
सदर घटनेनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडून सध्या घटनास्थळावर पंचनामा सुरु आहे. दरम्यान, ही नक्की आत्महत्या आहे की आणखीन काही याबाबत देखील पोलिस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाची बातमी : दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये
या खळबळजनक घटनेत एक पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. टीव्ही माध्यमानुसार समोर आलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचं वय ४५ वर्षे तर दोन मुलींचं वय १२ आणि ९ वर्षे असल्याचं समजतंय. आज संध्याकाळी साडे सहा वाजता सदर घटना घडली आहे. या तिघांनी गळफास घेत आत्महत्या का केली, याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा | Marathi News From Mumbai
man and her two daughter committes suicide in kandivali charkop gandhinagar area