पत्नी प्रियकरासोबत पळाली; पतीने मुलांची हत्या करत...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील वाशीनाका माहुल रोड येथे आज (ता.०८) सकाळी उघडकीस आली आहे.

मुंबई : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील वाशीनाका माहुल रोड येथे आज (ता.०८) सकाळी उघडकीस आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

माहुल रोड येथील कस्तुरबा नगरातील मॉडेला संकुलाच्या बाजूला रहात असलेल्या दिनेश यादव हा पत्नी व दोन मुलासमवेत काही वर्षापासून रहात होता. तिच्या पत्नीचे एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध होते. काही दिवसापूर्वी ती त्याच्यासमवेत पळून गेली. त्यामुळे दिनेश निराशावस्थेत होता. नाचक्की झाल्याने तो कोणासमोर जाण्यास तो धजावतही नव्हता.

अजित पवार, फडणवीस पुन्हा एकाच व्यासपीठावर; पण कुठे? 

शनिवारी रात्री त्याने नेत्रा व प्रणय या आपल्या मुलांना जेवणात विष घालून खाण्यास दिले. दोघे निपचिप पडल्यानंतर छताच्या अ‍ॅगलला काळ्या रंगाच्या ओढणीने गळफास लावून घेतला. सकाळी दहा वाजेपर्यत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्याने खिडकीतून डोकावून पाहिले असताना दिनेशचा मृतदेह लोंबकळत असल्याचे दिसले. पोलिसांना कळाल्यावर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father commits suicide killing two child in chembur

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: