Video अजित पवार, फडणवीस पुन्हा एकाच व्यासपीठावर; पण कुठे?

महा
रविवार, 8 डिसेंबर 2019

सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाला आज (ता.०८) दोघांनीही हजेरी लावली. दोघांनीही एकाच कोचवर बसून मनसोक्त गप्पा मारलेल्याही पाहायला मिळाल्या. 

सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाला आज (ता.०८) दोघांनीही हजेरी लावली. दोघांनीही एकाच कोचवर बसून मनसोक्त गप्पा मारलेल्याही पाहायला मिळाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे वऱ्हाडी मंडळी आणि राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. माढ्यामध्ये संजय शिंदे यांच्या मुलाचा हा शाही विवाह सोहळा संपन्न होत असून या विवाह सोहळ्याला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली होती.

म्हणून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी भुजबळ पोहोचले

२३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांनी शपथ घेतली होती. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला होता. मात्र, केवळ ८० तासांसाठीच हे सरकार टिकले. त्यानंतर पहिल्यांदा अजित पवार यांनी तर नंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 

फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना जीवदान

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली होती. त्याजागी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व सत्तानाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिल्यांदाच झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar devendra Fadnavis again on the same platform