तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या मुलाचा बापाने केला खून

दिनेश गोगी
सोमवार, 21 मे 2018

उल्हासनगर - भाजी चांगली झाली नाही म्हणून तीन महिन्यापूर्वीच बोहल्यावर चढलेल्या सुनेला भाजीवरून मारहाण, आणि या प्रकाराची विचारणा करणाऱ्या मुलाचा खून वडिलांनीच केल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, तीन महिन्यातच मुलाचा संसार उध्वस्त करणाऱ्या दारुड्या वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) अविनाश काळदाते यांनी ही माहिती दिली.

विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळ शास्त्रीनगर गोपाळ समाज वस्ती आहे. या वस्तीत राहणाऱ्या आणि हमालीचे काम करणाऱ्या कृष्णा उज्जेनकर उर्फ गोलू या 24 वर्षीय तरुणाचा तीन महिन्यापूर्वीच 19 वर्षीय रेखा सोबत विवाह झाला. गोलू हमालीचे काम करणारा. स्वतःचे घर असल्याने रेखा त्यात भावी संसाराची स्वप्ने बघू लागली. सासूचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असल्याने रेखावर घरगुती संसाराची जबाबदारी होती. गोलू दिवस भरातील हमालीतून मिळालेले रुपये रेखाच्या सुपूर्द करत असल्याने त्यातून ती संसाराची हाताळणी करत होती. संसाराचा गाडा निट सुरू असतानाच, काल सायंकाळी तिने केलेली भाजी तिचे सासरे शांताराम उज्जेनकर यांच्या ताटात वाढली. मात्र दारुड्या शांतारामला ही भाजी बेचव वाटू लागल्याने त्याने मुलीच्या वयाच्या सुनेला  मारहाण केली. गोलू घरी आल्यावर रेखाने पतीला प्रकार सांगितल्याने गोलुने त्याच्या वडिलांना विचारणा केली. याचा राग आलेल्या शांतारामने गोलूला जमिनीवर आपटून एका हाताने त्याचा गळा दाबून दुसऱ्या हाताने उशी तोंडावर ठेऊन गोलूचा खून केला. 

याघटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक(गुन्हे)अविनाश काळदाते, उपनिरीक्षक योगेश गायकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय आव्हाड, हवालदार बबन बांडे, संजय बेंद्रे, अनिल ठाकूर, प्रविण कुंभार यांनी शांताराम याला पवई चौकातून अटक केली.

Web Title: father killed of the boy who got married three months ago