

Mumbai Interstate Human Trafficking Gang
ESakal
मुंबई : धारावीतील एका दाम्पत्याने विकलेल्या बाळाची धारावी पोलिसांनी तमिळनाडूतून सुखरूप सुटका केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मुंबई ते तमिळनाडूदरम्यान कार्यरत असलेल्या मानवी तस्करीच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी शबनम खान, रामास्वामी, दीपक मोरे, जायदा खान, प्रिया आकाश बोऱ्हाडे आणि आकाश बो-हाडे या आरोपींना अटक केली आहे.