

Ghatkopar Crime News
ESakal
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या जन्मदात्यानेच थेट स्कायवॉकवरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून रागाच्या भरात बापानेच पोटच्या लेकाला स्कायवॉकवरून खाली फेकलं असून, या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.