esakal | नालासोपरा हादरलं! तीन मुलांची हत्या करुन पित्यानं उचललं हे पाऊल...
sakal

बोलून बातमी शोधा

नालासोपरा हादरलं! तीन मुलांची हत्या करुन पित्यानं उचललं हे पाऊल...

एका आत्महत्येच्या धक्कादायक प्रकारानं नालासोपारा चांगलंच हादरलं आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात शनिवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नालासोपरा हादरलं! तीन मुलांची हत्या करुन पित्यानं उचललं हे पाऊल...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई- एका आत्महत्येच्या धक्कादायक प्रकारानं नालासोपारा चांगलंच हादरलं आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात शनिवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी सोडून गेल्यानं नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी मृत कैलास परमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अरे बापरे... एका रात्रीत  मुंबईत आढळलेत अजस्त्र अजगर

नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा येथे कैलास परमार (वय 35) आपल्या कुटुंबासोबत राहात होता. शनिवारी रात्रीच्या 7 ते 8 च्या सुमारास त्याने नंदीनी परमार (8), नयना परमार (3) आणि नयन परमार (12) या तीन मुलांची चाकूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर देखील चाकूनं वार करुन आत्महत्या केली. 

मृत कैलास यांचा लसूण विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊनच्या काळात व्यवहार ठप्प झाल्यानं तो घरीच होता. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याची पत्नी घर सोडून गेली होती. गेल्यी दीड महिन्यापासून कैलासची पत्नी माहेरी असल्याचं कैलासचे वडील विजू परमार यांनी पोलिसांना सांगितलं. त्या नैराश्यामुळे त्यांनी हा घातपात करून स्वतःला संपवले असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. तसंच पत्नी माहेरी गेल्यावर कैलासच आपल्या तिन्ही मुलांचं पालनपोषण करत होता. 

दरम्यान शनिवारी सकाळी त्याने फेसबुकवर आपल्या पत्नीचा फोटो दुसऱ्या व्यक्तीबरोबर पहिला होता. कैलास जेवणासाठी मुलांसह वडिलांकडे जायचा. यामुळे शनिवारी दुपारी त्याने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर संध्याकाळी  संध्याकाळी 4 वाजता चहापाण्यासाठी वडील त्याला बोलवायला गेले. तेव्हा त्यानं मुलं झोपली आहेत. रात्रीच जेवायला येतो असं वडिलांना सांगितलं. पण आठ वाजले तरी कैलास आला नसल्याने त्याचे वडील पुन्हा त्याला बोलवायला गेले. यावेळी कैलासने दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजारच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर कैलास आणि त्याची तिन्ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, असं वडिलांनी पोलिसांना सांगितलं. 

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत. फेसबुकवर कैलासनं त्याच्या पत्नीचा फोटो पाहिल्यानंतर हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घरात एक साडी छताला टांगलेली आढळून आली. यामुळे कैलासने मुलांची हत्या करुन स्वतःवर वार करण्याआगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. तसंच कैलासच्या पत्नीची चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

loading image