esakal | सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल
sakal

बोलून बातमी शोधा

diabetes

विविध अहवालांनुसार कोरोना आणि मधुमेहामध्ये द्वय- दिशात्मक संबंध आहे आणि त्यामुळे एकंदरीत धोका तसेच मृत्यूची शक्यता वाढते.

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई, : देशातील मधुमेही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या माहितीतुन समोर आले आहे. देशात 2019 साली 7.29 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त होते. त्यातील 10 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात असून येथे कोरोनाचा कहर असल्याने रुग्णांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ञ डॉक्टर सांगतात.

हेही वाचा : मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेनं उचललं 'हे' महत्वाचं पाऊल; वाचा बातमी.. 

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, भारतात 5.8 टक्के महिला आणि 8 टक्के पुरुष मधुमेहाने ग्रस्त होते. तर, द लॅन्सेटच्या माहितीनुसार, 2030 पर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या 98 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशातील मधुमेहींच्या संख्येतील 8 ते 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांना असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेता मधुमेही रुग्णांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

विविध अहवालांनुसार कोरोना आणि मधुमेहामध्ये द्वय- दिशात्मक संबंध आहे आणि त्यामुळे एकंदरीत धोका तसेच मृत्यूची शक्यता वाढते. एका अभ्यासात मांडण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी अंदाजे 20 - 30 टक्के लोकांना मधुमेह असतो. कोरोनाविषाणूमुळे ग्लुकोज पचनात बदल होऊ शकतात व त्यामुळे आधीपासून असलेल्या मधुमेहाची स्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते किंवा त्यातून आजारात नवे पैलू दिसून येऊ शकतात. या दोन्ही आजारांचे स्वरुप लक्षात घेता भारतात त्याविषयी जागरूकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात या आजाराचा सामना करण्यासाठी त्यात समाविष्ट असलेल्या जोखमी समजून घेणे गरजेचे आहे. ही जोखीम  प्रतिकारशक्ती, ग्लुकोजची पातळी व शारीरिक मर्यादा या घटकांमध्ये विभागलेली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा : कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

मधुमेहींनी निरोगी जीवनशैली आणि योग्य आहाराचा अवलंब करणे, सुरक्षित अंतर राखणे, वेळेवर औषधे घेणे आणि वेळोवेळी तपासणी करून आरोग्यावर लक्ष ठेवणे तसेच आवश्यक उपाययोजना करणे या विषाणूचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आरोग्यसेवा क्षेत्राने जारी केलेले सुरक्षेचे उपाय तसेच प्रतिबंधात्मक प्रक्रियेचे पालन केल्यास संसर्ग टाळता येईल मात्र त्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोठी बातमी - मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

मधुमेहींना कोरोनाचा जास्त धोका

कोरोना विषाणूच्या लक्षणांच्या अभ्यासानुसार त्यांचा रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. हा आजार संसर्गजन्य स्वरुपाचा असून इतर जंतू संसर्गांप्रमाणे आणि श्वसन आजारांप्रमाणे पसरतो. हायपरग्लेसेमियामुळे मधुमेही रुग्णांच्या प्रतिकार शक्तीमध्ये बिघाड होत असल्यामुळे त्यांना संसर्ग आणि इतर गुंतागुंतींचा जास्त धोका असतो. म्हणूनच रुग्णांना या विषाणूचा सामना करणे जास्त अवघड होत आहे.

हेही वाचा : मोठी दिलासादायक बातमी! मुंबईतील 'या' दोन विभागांनी गाठले शतक; वाचा सविस्तर बातमी..

मधुमेहींनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो. त्याचसोबत पौष्टीक अन्नाचे सेवन आणि व्यायाम केला पाहिजे. जेणेकरून, शरीरातील साखरेच्या प्रमाणावर योग्य नियंत्रण राहील.

- डॉ. महेश चव्हाण, सल्लागार, एंडोक्रिनोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई.

Diabetes is on the rise in the country, including Corona read the number of patients in Maharashtra alone

loading image