अरे बापरे... एका रात्रीत  मुंबईत आढळलेत अजस्त्र अजगर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

मुंबईत कडक ऊन पडत असल्याने अनेक साप आता ओलाव्याच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले आहेत. कंजूरमार्गमध्ये प्राणी मित्रांनी  एका रात्रीत चक्क दोन अजगर पकडले

मुंबई : मुंबईत कडक ऊन पडत असल्याने अनेक साप आता ओलाव्याच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले आहेत. कंजूरमार्गमध्ये प्राणी मित्रांनी  एका रात्रीत चक्क दोन अजगर पकडले. यातील एका अजगराच्या लांबी तर चक्क 8 फूट लांब होती. अजगरासोबत मुलुंडमध्ये तस्कर सापाला देखील रेस्क्यू करण्यात आले आहे. 

कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अवंती कंट्रक्शन साईटच्या येथे हा अजस्त्र अजगर असल्याची माहिती एका इसमाने प्लँट अँड ऍनिमल वेल्फेयर सोसायटी - मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) यांनी दिली. संस्थेचे स्वयंसेवक हसमुख वाळंजू यांना ही माहिती मिळताच मध्यरात्री अडीच वाजता हे अवंती कंट्रक्शन येथे पोहोचले. तेव्हा त्या साईटवर आठ फुटी अजगर असल्याचे दिसले. लागलीच वाळुंज यांनी अजगराची सुटका करून वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर राहुल मेश्राम यांच्या दवाखान्यात नेले. अजगर सुदृढ असून याची माहिती वनविभागाला देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याची माहिती पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी सांगितले.

BIG NEWS मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण...

यानंतर पुन्हा एकदा पहाटे साडेसहाच्या सुमारास रमेश चव्हाण या व्यक्तीचा पॉज मुंबई संघटनेच्या कार्यालयात फोन आला. आमच्या दरवाजा जवळ एक छोटा अजगर आला असल्याची माहिती त्यांनी दिली. माहिती मिळताच पॉज-मुंबई एसीएफचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचून त्यांनी एक फूटी अजगराला ताब्यात घेतले. यानंतर एक दुर्मिळ तस्कर साप मुलुंड पश्चिम अमर नगर येथील एका घरावरती दिसून आला. स्थानिक रहिवाश्यांंनी याची माहिती पॉज-मुंबईला दिली. त्यानंतर तेथील स्थानिक स्वयंसेवक यांनी त्या सापाला सुखरूपपणे रेस्क्यू केले असून तीनही सापांना जंगलात सोडण्यात आले.

मुंबईत अश्या प्रकारे पशू-पक्षी किंवा साप आढळून आले, तर पॉज-मुंबई एसीएफ हेल्पलाईन क्रमांक 9833480388 किंवा वन विभाग नियंत्रण कक्षाशी 1926 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पॉज मुंबई संस्थेकडून करण्यात आले आहे.\

BIG NEWS  - मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

अजगर बिनविषारी साप : 

पालापाचोळ्याचे ढीग करून मादी त्यात नऊ ते दहा अंडी घालते व शरीराचे वेटोळे करून ती अंडी उबवते. अंडी नऊ ते दहा सेंटिमीटर लांबीची व सुमारे 100 ग्रॅम वजनाची असते. नव्वद ते शंभर दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात व ती पिलांची लांबी 30 सेंटीमीटर इतकी असते. अजगराचे प्रमुख खाद्य उंदीर घूस, बेडूक व इतर सस्तन मोठे प्राणी आहे. अजगराची अधिकतम लांबी अंदाजे 24 फुट इतकी वाढते.

तस्कर साप बिनविषारी : 

मुंबईमध्ये हा साप दुर्मिळ आहे. या सापाची सरासरी लांबी सहा फूट इतकी होते. याचे प्रमुख खाद्य इतर पक्ष्यांची अंडी, पक्षी किंवा उंदीर असे आहे.  मादी तस्कर दहा ते अकरा अंडी घालते आणि शरीराचे वेटोळे करून ती त्यांना उबवते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्यानंतरच आपल्या मार्गात ती तेथील जागा सोडून देते.

huge indian python rescued from construction site of mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge indian python rescued from construction site of mumbai