esakal | 'मुरली मृदंग'ला नवरात्रीत पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

'मुरली मृदंग'ला नवरात्रीत पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरब्याची नवनवीन गाणी रिलीज होत असतात. यंदा नवरात्रीनिमित्त आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या पत्नी वसई-विरारच्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर नवे गाणे प्रसिद्ध झाले आहे.

'मुरली मृदंग' असे गाण्याचे बोल असून प्रवीणा ठाकूर यांनीच ते लिहिले आहे. गाण्याला संगीतही त्यांनीच दिलंय अन् आवाजही... गाणे चित्रितही त्यांच्यावर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर गाण्याला चांगली पसंती मिळत असून नवरात्रोत्सवातही ते गाजत आहे. यापूर्वीही प्रवीणा ठाकूर यांची तीन गाणी प्रसिद्ध झाली आहेत.

हेही वाचा: ‘बिग बी’ यांची पानमसाला जाहिरातींवर फुली

'होरी खेळन पधारो नंदलाल', 'हे कृष्ण तुम' आणि सकाळच्या प्रहरी कृष्णाला जागवण्यासाठी गायलेलं 'उठो उठो राजा धी राजा' अशा गाण्यांनी त्यांना ओळख मिळवून दिली आहे.

loading image
go to top