

FDA
ESakal
मुंबई : दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. यात प्रसिद्ध सोनई दूध डेअरीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा पुरवठा तसेच दूध संकलन व शीतकरण केंद्रांची तपासणी करण्यात आली.