

Mumbai FDA Action
ESakal
मुंबई : मुंबईतील खाद्यपदार्थ विक्री आणि तयार करणाऱ्या सहा आस्थापनांत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. वांद्रे, सांताक्रूझ, कुलाबा, चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील या आस्थापनांवर गुरुवारी (ता. १९) कारवाई करण्यात आली. परवाने निलंबित केल्याने या आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी, विक्री किंवा वितरण करता येणार नाही.