

FDA Action
ESakal
मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम राबवत आठ अन्न आस्थापनांवर कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक, परिसराची स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या आवश्यक नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित, तर तीन आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.