

Foods Expiry date changed in turbhe MIDC
ESakal
नवी मुंबई : तुर्भे येथील एका कंपनीत खाद्यपदार्थावरील एक्स्पायरी डेट बदलून वाढीव तारीख असलेले स्टिकर चिकटवण्याचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पथकाने या कंपनीवर छापा घालून परदेशात पाठवला जाणारा सुमारे ७५ लाखांचा साठा जप्त केला. एफडीएच्या मदतीने याप्रकरणी संबंधितांवर तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.