

FDA Food Safety Inspection Targets Mumbai Bakeries Six Licenses Suspended Four Shops Face Closure Orders
sakal
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि बेकरी आस्थापनांवर कारवाई केली. या मोहिमेत राज्यातील ६१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावल्या, तर सहा अन्न व्यवसायांचे परवाने तत्काळ निलंबित केले. चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.